spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गाडीला कट मारल्याचा राग, अल्पवयीन पोराने इंजिनिअरींच्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकले

उदय तिमांडे ,प्रतिनिधी, नागपूर :- मोटर सायकलचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याची अल्पवयीन मुलाने चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. तुषार तुटे असे मृतक तरुणाचे नाव आहे.

नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्यातील गोकुळ पेठ परिसरात ही घटना घडली. अंबाझरी पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली. पुढील काही तासांत पोलीस आरोपींना न्यायालयात हजर करतील.

तुषार तुटे असे मृतक तरुणाचे नाव असून तो अभियांत्रिकाचा विद्यार्थी होता. नागपूरच्या लक्ष्मी भुवन चौकात ओव्हरटेक करताना गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून आरोपी आणि मृतक तुषार यांच्या वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर अल्पवयीन मुलाने जवळ असलेल्या चाकूने तुषारवर वार केले.

जखमी अवस्थेत तुषारला रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. मुलाला चाकूने भोसकून ठार केल्याचे वृत्त तुटे कुटुंबाला कळताच त्यांनी हंबरडा फोडला. आरोपींना कठोरता कठोर शिक्षा करण्याची मागणी तुषारच्या नातेवाईंनी केली.

नागपूरमधील अंबाझरी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गुन्ह्यांसंबंधी अधिक चौकशी सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वि.दा. गोडबोले यांनी आरोपींवर गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.