spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अण्णा भाऊ साठे महामंडळ थेट कर्ज योजनेत लाभार्थी निवडीसाठी १० ऑक्टोबर रोजी सोडत

यवतमाळ :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, यवतमाळ यांच्या वतीने थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्जप्रकरणांची लॉटरी (ईश्वर चिठ्ठी) पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम १० ऑक्टोबर २०२५ रोजी, सकाळी १२.०० वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पळसवाडी कॅम्प, दारव्हा रोड, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. महामंडळाच्या १ लाख रुपयांच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व लाभार्थ्यांना कळविण्यात येते की, लॉटरी पद्धतीने कर्ज मंजुरी प्रक्रिया या दिवशी पार पडणार आहे.

या योजनेअंतर्गत मांतग, मांग, मांग-गारोडी व मादीगा समाजातील अर्जदारांनी या कार्यक्रमास आवश्यकतेने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, यवतमाळ यांनी केले आहे.लॉटरीमध्ये सहभागी होण्यासाठी, सर्व लाभार्थ्यांनी महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपले कर्जप्रकरण यादीमध्ये समाविष्ट आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. कोणतीही तक्रार, हरकत किंवा माहिती हवी असल्यास लाभार्थींनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालय, यवतमाळ येथे वेळेत संपर्क साधावा, असेही जिल्हा व्यवस्थापकांनी स्पष्ट केले आहे.

Popular Articles