खापा :- स्थानिक जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविघालय येथे वार्षीक महोत्सव २०२६ चे थाटात उद्घाटन करण्यात आले. या निमित्ताने विज्ञान प्रदर्शनी व इंग्रजी प्रदर्शनी आयोजन करण्यात आले.
त्या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष पियुष बुरडे, उपनगराध्यक्ष सुनिल पाहुणे, रमेश खुबाळकर, शाळा समिती सभासद रमेश खुबाळकर, जयंत लांजेवार, उमेश धोटे पंचायत समिती, सावनेर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका रचना मोहने यांनी केले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर गजभिये यांनी केले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षिका मुक्ता कडू, राजेन्द्र भोगांडे, उमेश चौरे, आनंद मेनकुदळे, भारती कुमरे, वडे इत्यादी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




