Home Latest News मनोज जरांगेंना आणखी एक झटका

मनोज जरांगेंना आणखी एक झटका

0
8

– कोणाला सुगावा लागू न देता अंतरवाली सराटीतून एका रात्रीत उपोषणाचा मंडप हटवला

जालना :- अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी उभारण्यात आलेला मंडप अखेर रात्रीतून हटवण्यात आला आहे. ग्रामस्थ आणि सरपंचांच्या निर्णयानंतर हा मंडप काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याच मंडपातून आणि व्यासपीठावरून (स्टेजवरून) मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली होती. दरम्यान, शेवटच्या उपोषणाच्या वेळी मनोज जरांगे यांनी ‘आपले हे उपोषण निर्णायक आणि अंतिम आहे’, असे सांगितले होते. मागील काही दिवसांपासून ग्रामस्थांमध्ये या मंडपावरून कुजबूज ऐकायला मिळत होती आणि अखेर आज हा मंडप काढण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, गावचे सरपंच आणि मनोज जरांगे यांची जी कोर कमिटी आहे, त्यांच्यामध्ये संवाद झाला आणि काही ग्रामस्थांनीही त्याला प्रतिसाद देत हा मंडप रात्रीतून काढण्याचा निर्णय घेतला. रात्रभरातून हा सगळा मंडप आणि मनोज जरांगे ज्या ठिकाणी उपोषणाला बसत होते, ते स्टेजदेखील काढण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, २९ ऑगस्ट २०२३ रोजी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी हे आंदोलन सुरू केले होते. या दरम्यानच्या काळात मनोज जरांगे यांनी अनेकदा उपोषण स्थगित केले, मात्र हे स्टेज किंवा मंडप कधीही काढण्यात आलेला नव्हता. परंतु, यावेळी तो काढण्यात आला आहे. हा मंडप हटवण्यामागे इतरही काही कारणे सांगितली जात आहेत. साधारण १-१.५ वर्षांपूर्वी काही ग्रामस्थांनी या उपोषणाला विरोध दर्शवला होता आणि तसे लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने ग्रामस्थांमध्ये एक कुजबूज ऐकायला मिळत होती. तसेच, येत्या २८ तारखेला ग्रामसभेची बैठक होणार असून, त्या बैठकीतील संभाव्य विरोध लक्षात घेता हा मंडप आधीच हटवण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आता याबाबत सरपंच किंवा स्वतः मनोज जरांगे पाटील अधिकृत भूमिका मांडतील. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून चाललेल्या लढ्याचे व्यासपीठ, जिथून हे आंदोलन सुरू झाले होते, तिथला मंडप आणि स्टेज रात्रीतून हटवण्यात आले आहे. मनोज जरांगे यांच्या कोर कमिटीचे स्थानिक सदस्य आणि काही ग्रामस्थांनी मिळून हा मंडप काढल्याची माहिती आहे. आज सकाळी जेव्हा तिथली दृश्ये पाहण्यात आली, तेव्हा नेहमी असणारी गजबज तिथे दिसली नाही; आता तिथे कोणीही पाहायला मिळत नाही. आता यापुढील स्पष्टीकरण मनोज जरांगे पाटील देतीलच, मात्र ज्या पद्धतीने हा मंडप हटवण्यात आला आहे, त्यावरून मनोज जरांगे यापुढे किमान अंतरवली सराटीमध्ये तरी आंदोलन करणार नाहीत, ही बाब स्पष्ट होत आहे. त्यामुळे जवळपास तीन वर्षांनंतर हटवण्यात आलेल्या या मंडपाबाबत मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

अंतरवाली सराटीतील मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळाचा मंडप काढला, स्टेज देखील काढण्यात आला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणासाठी उभारण्यात आलेला मंडप रात्रीतून हटवण्यात आला. ग्रामस्थ आणि सरपंचांनी घेतलेल्या निर्णयानंतर मंडप काढण्यात आल्याची माहिती आहे. याच मंडपातून आणि स्टेजवरून मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली होती. दरम्यान शेवटच्या उपोषणावेळी मनोज जरांगे यांनी आपले हे उपोषण निर्णायक आणि अंतिम असल्याचे सांगितलं होतं. दरम्यान मागील उपोषणापासून ग्रामस्थांमध्ये मंडपावरून कुजबूज ऐकायला मिळत होती, आज अखेर हा मंडप काढण्यात आला आहे. मनोज जरांगे यांचं आंदोलन 3 वर्ष 27 दिवस चाललं. 29 ऑगस्ट 2023 ते 25 सप्टेंबर 2026 पर्यंत हा मंडप आणि स्टेज तसेच होते. आज अखेर आंदोलन स्थळावरील मंडप आणि स्टेज काढण्यात आले आहे.