spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हरित कन्हानच्या दिशेने आणखी एक पाऊल

– नगराध्यक्ष शेंदरे यांचे पुढाकाराने वृक्षारोपण

कन्हान :- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन कन्हान नगरपरिषद अंतर्गत तारसा चौक ते गहुहिवरा रोड परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कन्हान नगरपरिषद नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांचे पुढाकाराने आणि स्वखर्चातुन राबविण्यात आले ल्या उपक्रमामुळे हरित कन्हानच्या संकल्पनेला नवे बळ मिळाले आहे.

पर्यावरण संवर्धन हा केवळ एक दिवसाचा उपक्रम नसुन ती सामाजिक जबाबदारी असल्याचा संदेश कार्यक्रमातुन देत नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांनी विशिष्ट प्रजातींच्या वृक्षांची लागवड करताना झाडांचे संगोपन आणि संवर्धन यालाच खरे महत्त्व असल्याचे अधोरेखित केले. “वृक्ष हेच जीवनाचे खरे आधार स्तंभ आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखण्यास प्रत्येक नागरि काने किमान एक वृक्ष लावुन त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. भावी पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.”

विशेष बाब म्हणजे राजेंद्र शेंदरे हे दरवर्षी स्व खर्चाने वृक्षारोपण करून झाडांची नियमित देखभाल करतात. पाणीपुरवठा, खत, खुरपणी तसेच झाडे मोठी होईपर्यंत त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ते स्वतः पार पाडतात. त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत असुन अनेक नागरिकांना पर्यावरण संवर्ध नास प्रेरणा मिळत आहे. याप्रसंगी भाजपा नागपुर जिल्हा उपाध्यक्ष व स्विकृत सदस्य सुनंदा दिवटे, गटनेते मनोज कुरडकर, बांधकाम सभापती केतन भिवगडे, कन्हान मंडळ अध्यक्ष बिरेंद्र सिंग, शहराध्यक्ष महेंद्र साबरे, सभापती योगिता भलावी, प्रशांत पाटील, नगर सेवक शिवशंकर वाकुडकर, विनोद किरपान, नगरसे विका सुषमा चोपकर, मोनिका पौनिकर, प्रियंका ठाकु र, कैलास खंडार, आकाश महातो, लकी ठाकुर, दीपंक र गजभिये आदी सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

” वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा” आणि “हरित कन्हान – स्वच्छ कन्हान” या संदेशांसह कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागाची गरज अधोरेखित करणारा हा उप क्रम कन्हानकरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.