spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नेपाळचा प्रवास सद्यस्थितीत टाळण्याचे आवाहन

नागरीकांच्या मदतीसाठी दूरध्वनी क्रमांक जाहीर

नागपूर,दि. ११  : नेपाळमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पर्यटकांनी सद्यस्थितीत नेपाळ प्रवास टाळावा, असे आवाहन राज्य आपातकालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र राज्य व परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. जे नागरीक सद्या नेपाळमध्ये आहेत त्यांनी आपल्या निवासस्थानी सुरक्षित राहावे. अनावश्यकपणे बाहेर पडू नये. याचबरोबर स्थानिक प्रशासन व भारताच्या दूतावासाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. संपर्कासाठी व माहितीसाठी व्हॅट्सॲप कॉल करता यावे यादृष्टीने नंबर उपलब्ध करुन दिले आहेत. यात ‪+977 9808602881‬,  ‪+977 9810326134‬ हे क्रमांक नेपाळमधील आहेत. महाराष्ट्रातील आपत्कालीन कार्य केंद्रासाठी ‪+91 9321587143‬,  ‪+91 8657112333‬. नागपूर जिल्ह्यातील नागरीक नेपाळमध्ये असतील तर त्यांच्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे दूरध्वनी क्रमांक 0712 2562668 अथवा 8860018817 या दूरध्वनीक्रमांकावर संपर्क साधता येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.