spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

युरीया ऐवजी स्फुरद फॉस्फरस आणि पालाश पोटॅश खते वापरण्याचे आवाहन

 

यवतमाळ, दि. २९ : सोयाबिन हे शेंगवर्गीय पिक असून त्याच्या मुळांवर रायझोबियम नावाचे जिवाणू नैसर्गिकरित्या नत्र नायट्रोजन उपलब्ध करुन देतात. त्यामुळे या पिकासाठी वेगळ्या स्वरुपात नत्र खताची गरज भासत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी युरिया खताचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

युरीया खताच्या अतिवापरामुळे पिकावर दुष्परिणाम होतात. झाडांवर शाखा, पाने वाढतात पण शेंगा आणि दाण्यांची संख्या कमी होते. पानात मऊपणा वाढल्यामुळे पीक किडींसाठी आकर्षक ठरते. युरीयामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव प्रभावित होतात. या सर्व बाबी पाहता अनावश्यकपणे युरिया वापर केल्यास त्याच्या खरेदीमुळे खर्च वाढतो.

पिकाला स्फुरद फॉस्फरस आणि पालाश पोटॅश युक्त खतांचा वापर करावा. कृषि विभागाच्या सल्ल्यानुसार खतांचा वापर करावा आणि उत्पादनवाढीसोबतच जमिनीची सुपीकता जपावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

Popular Articles