spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपा निवडणुकीसाठी १२९४ उमेदवारांचे अर्ज वैध

– ८० जणांचे उमेदवारी अर्ज ठरले बाद

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता छाननीनंतर १२९४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून ८० उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत.

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर रोजी संपली आहे. शहरातील १० झोनमधील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीनंतर वैध उमेदवारांची संख्या जाहीर करण्यात आली आहे. यात एकूण १२९४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून, यात ५३५ महिला उमेदवारांचा समावेश आहे.

छाननीनंतर दहा झोनमध्ये ८० जणांचे अर्ज बाद ठरले आहेत. यात ३९ महिला उमेदवारांचेही अर्ज बाद ठरले आहेत. छाननीनंतर प्रत्येक झोनमधील वैध उमेदवारांची संख्या स्पष्ट झाली आहे. यात सर्वाधिक उमेदवार झोन क्रमांक ९ मध्ये असून पात्र उमेदवारांची संख्या १८० आहे तर यात ९२ महिला उमेदवारांचा समावेश आहे. सर्वात कमी उमेदवार झोन क्रमांक १ मध्ये असून यात केवळ ७५ उमेदवार रिंगणात उरले आहेत. यात ३४ महिला उमेदवारांचा समावेश आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.