कामठी :- तेजस संस्थेची स्थापना संत गाडगे बाबांच्या दहा-सूत्री कार्य करण्यासाठी अरगुलेवारने केली अरगुलेवार च्य एक ध्येय गरीब आणि गरजूंची सेवा करणे. मध्य प्रदेशातील इटारसी येथील रहिवासी शांतीलाल अहिर यांना तोंडाचा कर्करोग झाला होता. कर्करोगामुळे भोपाळमधील रोशन रुग्णालयात शांतीलाल यांच्या जबड्याची एक बाजू काढण्यात आली. शांतीलाल २०१८ पासून तोंडाच्या कर्करोगाने ग्रस्त आणि त्रस्त आहेत. तेजस संस्थाला जुळलेले इटारसीचे सामाजिक कार्यकर्ते राजकुमार मालवीय यांच्याशी शांतीलालन संपर्क साधला. राजकुमार यांनी शांतीलाल आहिर यांच्या आजाराची संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि फोनवरून अरगुलेवार यांना सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की शांतीलाल त्यांच्या उपचारांवर होणाऱ्या आर्थिक खर्चामुळे पूर्णपणे तुटून गेले आहे. आता पुढील उपचारांची शक्यता नाही. ते खूप दुःखी आहेत आणि त्यांना तुमच्या मदतीची खूप गरज आहे. अरगुलेवार यांनी वेळ वाया ना घालून आशा हॉस्पिटलचे संचालक डॉ. सौरभ अग्रवाल यांच्याशी बोलून. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी शांतीलाल यांना आशा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ.अमितकुमार देशराज आणि कर्करोग सर्जन डॉ.वरुण सनाप यांनी उपचार सुरू केला. डॉ.सौरभ अग्रवाल यांनी अत्यंत कमी खर्चात सीटी स्कॅन करून संपूर्ण जाच केली जाच केल्यानंतर तोंडात गंभीर जखम होण्याची जानकारी भेटली आणि उर्वरित उपचार मोफत मधे केले. पुढचा इलाज पण मोफत मध्ये करून देण्याचे हमी डॉ.सौरभ अग्रवाल ना दिली आशा हॉस्पिटलच्य संचालक डॉ. सौरभ अग्रवाल ,डॉ अमित देशराज , डॉ वरुण सनाप ,कार्तिक भिसेकर , भोला द्विवेदी, मानसी बंडीवार, यांचा अरगुलेवारन खुप खुप आभार मानला ,नागपूर जिल्ह्यातील डॉक्टरांशी अरगुलेवारचे खुप चांगले संबंध असल्यामुळे हे सगळे शक्य होत आहे आणि अरगुलेवार त्यांच्या कामाची हे पावती आहे. अरगुलेवार यांच्याशी बोलताना ते म्हणाले, *”जे आम्हाला सोबत घेऊन जायचं आहे ते आम्ही सोडत आहे”
“ज्याला आम्हाला सोडून जायचं आहे हे ते जोडत आहे ” माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या सेवा अशाच सुरू राहतील. धोबी समाजाची १० कोटी लोकसंख्या मधून या सेवांसाठी गाडगे बाबांनी माझी निवड केली. मी गाडगे बाबांचा खूप खूप आभारी आहे.




