spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अरोली सरपंचा रोशनी प्रशांत भुरे सरपंच सम्राट अवॉर्डने सन्मानित 

किशोर साहू, मौदा :- दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदी दैनिक नवभारत व मराठी दैनिक नवराष्ट्र यांनी संयुक्तरित्या जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरपंच मंडळींना सरपंच सम्राट अवार्ड नुकतेच घोषित केले. अरोली सरपंचा रोशनी प्रशांत भुरे यांनाही राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते सरपंच सम्राट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी आमदार राजीव पोतदार व इतर मान्यवर उपस्थित होते.

पटसंख्येअभावी राज्यातील जिल्हा परिषद शाळा बंद पडत आहे. मात्र अरोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पटसंख्या सरपंच रोशनी भुरे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे लक्षणीय वाढलेली आहे. सरपंच भुरे यांनी जि प शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत शिक्षकाची नेमणूक केली, शाळेला ग्रामपंचायत मार्फत व विविध योजनेमार्फत संपूर्ण भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या व काही विशेष योजनाही राबविल्या. अरोली जिल्हा परिषद शाळेतील वाढलेली शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधा पाहून पालक वर्ग अरोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे आकर्षित होऊन त्यांच्या पाल्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाठवू लागले. त्यामुळे येथील पटसंख्या टिकलीच नाही तर पटसंख्येत लक्षनीय वाढ झालेली आहे.

सरपंचा रोशनी भुरे यांचे पती प्रशांत बाळासाहेब भुरे हे तालुका शिवसेनाप्रमुख व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे निकटवर्ती असल्याने पतीच्या मार्गदर्शनामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या सहकार्याने गावातील विविध विकास कामांसाठी व शेत शिवारातील पाधण रस्त्यांसाठी करोडो रुपयांच्या निधी खेचून आणल्याने, गावात विकासाची गंगा वाहत असून गावात सर्वच प्रकारची विकास कामे सुरू आहेत.

अरोली ग्रामपंचायतच्या इतिहासात प्रथमच अरोली ग्रामपंचायतला सरपंच सम्राट अवार्ड मिळाल्याने अरोली- कोदामेंढी जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या गावातील मित्र परिवाराकडून व ग्रामवासीयांकडून सरपंचा भुरे यांच्यावर अभिनंदनाचा  वर्षाव सुरू असून, हा पुरस्कार मला ग्रामवासीयांच्या सहकार्यामुळे मिळाला असून, हा पुरस्कार ग्रामवासियांनी समर्पित असल्याचे पुरस्कार मिळाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना सरपंचा भुरे यांनी सांगितले. पुरस्कार मिळाल्याने काम करण्याच्या वेग वाढत असून विरोधकांच्या तक्रारी व टिकेला न घाबरता यापुढे अरोली गावाचा नावाचा ठसा तालुक्यात, जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही उमटविणार असल्याचे सरपंच भुरे यांनी अतिशय उर्जेने सांगितले, हे विशेष!

Popular Articles