spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ विषयावर प्रधान सचिव प्रवीण दराडे यांची विशेष मुलाखत

– ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विशेष मुलाखतीचा दुसरा भाग २५ ऑगस्ट रोजी

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या लोकप्रिय कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ या योजनेविषयी सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्या विशेष मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित करण्यात येणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विशेष मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचे प्रसारण मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर होणार आहे. त्यानंतर ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम चांदोरकर यांनी केले आहे.

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे, कृषी क्षेत्र अधिक सक्षम व शाश्वत करणे तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांची माहिती या मुलाखतीतून देण्यात येत आहे.

मुलाखतीच्या दुसऱ्या भागात योजनेची अंमलबजावणी, लाभार्थी निवडीची प्रक्रिया, पात्र शेतकऱ्यांना मिळणारा लाभ, डिजिटल प्रणालीचा वापर, कर्जखात्यांची पडताळणी, पारदर्शक व कार्यक्षम अंमलबजावणी तसेच योजनेच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणाऱ्या आर्थिक बळकटीविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तसेच सहकार विभागाची भूमिका आणि ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या राज्याच्या विकासदृष्टीच्या पूर्ततेमध्ये या योजनेचे महत्त्व याबाबतही माहिती दिली जाणार आहे.

अधिकृत समाजमाध्यमे :

X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

Popular Articles