Home Latest News मुंडीकोटा येथे तंटामुक्त अध्यक्षपदी अरुणा डोंगरे निवड

मुंडीकोटा येथे तंटामुक्त अध्यक्षपदी अरुणा डोंगरे निवड

0
75

तिरोडा १२ :-  तालुक्यातील मुंडीकोटा येथील नुकतीच तंटामुक्त अध्यक्षपदी अरुणा डोंगरे यांची निवड करण्यात आली. या अगोदर तंटामुक्ती अध्यक्ष पदावर चैतराम रोडगे हे होते. त्यानंतर तंटामुक्ती अध्यक्ष पद रिक्त झाल्याने तंटामुक्त अध्यक्षपदी नव्याने निवड करण्यात आली. त्यामध्ये अरुणा डोंगरे यांची तंटामुक्त अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. त्या अगोदर अरुणा डोंगरे हे सरपंच पद तसेच ग्रामपंचायत सदस्य देखील पदावर  राहिलेल्या आहेत ‌त्यांना या  कामाची जाणीव ठेवून त्यांना या पदावर निवड करण्यात आली आहे .त्यांच्या या निवडीबद्दल ग्रामपंचायत सरपंच प्रतिमा जैतवार ग्राम पंचायत उपसरपंच देवेंद्र  मंडपे,पोलीस पाटील महेंद्र डोंगरे, यांनी अभिनंदन केले आहे