spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आशा वर्कर यांना योग्य कामाचा योग्य मोबदला देणार

– भंडारा डीएचओ ने दिले सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन

भंडारा :- आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (CITU) भंडारा जिल्हा तर्फे जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) डॉ. मेजर नितीन कापसे यांच्यासोबत युनियनच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद येथे मीटिंग घेतली.

मागण्या :

1) आशा योजना ( NHM योजना ) स्थाई योजना म्हणून कायम करा.

2) आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा द्या.

3) किमान वेतन 30 हजार रु.महिना लागू करा.

4) सेवा निवृत्तीनंतर 5 लाख रुपये ग्रॅज्युटी व 10 हजार रु. मासिक पेन्शन द्या.

5) सेवानिवृत्तीची वय 65 वर्षे झाली पाहिजे.

6) पगारी प्रसूती रजा 6 महिने व वार्षिक सुट्या 15 दिवसाच्या लागू करा.

7) राज्य केंद्राकडून नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त इतर काम करताना आशा वर्कर वर दबाब टाकणे बंद करा.

8) जिल्हास्तरावर समन्वय समिती निर्माण करून दर तीन महिन्याने समन्वय साधण्याकरता मीटिंगची व्यवस्था करा.

आरोग्यवर्धिनीचा निधी कपात न करता आशा वर्कर यांना पूर्ण निधी देण्याची व्यवस्था करावी, हत्तीरोग, कुष्टरोग,क्षयरोग सर्वे, स्पुटम गोळा करणे व क्षयरोग रुग्णांना औषधांच्या पुरवठा करनाऱ्या आशा वर्कर यांना थकीत 2023 पासूनचा निधी त्वरित द्या, विना मोबदला किंवा विना पत्राने आशा वर्कर वर दबाव टाकू नये, आबा कार्ड व मातृत्व वंदन योजनेच्या निधीची त्वरित व्यवस्था करा. अशा विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या योजनेद्वारे शंभर टक्के आशा वर्कर यांनी शंभर टक्के काम करावे अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.शिष्टमंडळात काँ. राजेंद्र साठे, उषा मेश्राम,सुनंदा बसेशंकर, प्रीती मेश्राम, वैशाली सोमकुवर, श्वेता नागमोते वनिता तितीरमारे उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.