किशोर साहू, मौदा :- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त इको क्लब उपक्रमांतर्गत इको क्लब मधील सर्व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. इको क्लब मधील सर्व सदस्य यांनी विविध प्रकारचे वृक्ष झाडांचे वृक्षारोपण केले. सुरुवातीला मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी स्कॉलरशिपच्या परीक्षेत पात्र झालेल्या वर्ग 7 व्या वर्गातील पात्र 15 विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.तसेच वर्ग 4थ्या वर्गातील 1 विद्यार्थीनी स्कॉलरशिपच्या परीक्षेत पात्र झाली आहे.मिळेलेले यश विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ तसेच सर्व शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाचे फळ निश्चित स्वरूपात मिळाले. 

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त सुरुवातीला विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी आपल्या जिवनात सामान्य परिस्थितीतुन भारताच्या राष्ट्रपती पर्यंत कसा जीवनाचा प्रवास केला याबद्दल मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गट ग्रामपंचायत दहेगाव सरपंच भारती आंबीलढुके,प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे उपस्थित होते. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्रावर विद्यार्थ्यांनी भाषण दिले. आजच्या या डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त इको क्लब अंतर्गत राजेश रोहाड यांच्या विशेष सहकार्याने शाळेच्या परिसरात विविध ठिकाणी वृक्षारोपण केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद सुधीर खंडाईत , राजेश रोहाड ,सुधीर कांबळे , सुजाता बोदेले , प्रज्ञा रामटेके , संगीता कारेमोरे , पुष्पलता उके, उमेश उके,कैलास फटिंग, रामदास अहिरकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षक राजेश रोहाड यांनी केले.





