नागपूर :- ऑक्टोबर रोजी सर्व पक्षीय व समाजीक संघटने च्यावतीने भारताच्या सुप्रिम कोर्टाच्या चिफ जस्टीस ऑफ इंडिया न्या. भुषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधात भव्य जनआंदोलन, नारे निर्देशने समता पार्क, महात्मा फुले चौक, गोधनी रेल्वे येथील यशवंत तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. याप्रसंगी रिपा, बसपा, बिआरएसपी, कॉग्रेस, आम पार्टी, सत्यशोधक समाज संघटन, वंचित बहुजन आघाडी, द अनागारीक फाउंडेशन, समता सैनिक दल, भारतीय बौध्द महासभा इत्यादी संघटनेच्या वतीने सन्मानीय ईश्वर सरोदे, राहुल मनोहर, रामदास वनारकर, अनुपमा तेलंग, सुनंदा गजभीये, आशा लोखंडे, अलका पोपटकर, विद्या झाडे, अरूण राऊत, विजय पाल आवळे, रत्नाकर वाडके, भिमराव भोतकर, मोरध्वज अढाऊ, राजू कोलते, प्रेमदास चहांदे, महेंद्र भगत, अशोक डोईफोडे, दिगांबर डोंगरे, अनिल चिमोटे, वामन मनोहर, अतुल मनोहर, प्रफुल्ल सोनुले, शेषराव गहुकर इत्यादी सर्व पक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य जनआंदोलनात मौलीक मार्गदर्शन वरील घटनेच्या निषेधार्थ ईश्वर सरोदे, राहूल मनोहर, विजय पाल आवडे, रत्नाकर वाडके, रामदास वनारकर, मोरध्वज अढाऊ, अनुपमा तेलंग, सुनंदा गजभिये, अलका पोपटकर इत्यादींनी या घटनेच्या आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला.

आणि सर्व म्हणाले की, कृत करणाऱ्या आरोपीवर अट्रासिटी ॲक्ट, संविधानाचा अपमान, न्यायालयाचा अपमान करण्याच्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करून त्याची वकीली सनद रद्द करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून यशवंत तेलंग म्हणाले की, चिफ जस्टीस वरील हल्ला हा भारतीय न्यायव्यवस्थेला जगा समोर कलंकीत करणारा होय. हा मानसीक वेडेपना नसून हा सुनियोजित कट करास्तानातून घडलेला प्रकार असून यामुळे लोकशाही कलंकीत झालेली असून देशात अशांतता व सामाजीक सलोखा बिगडविण्याचा प्रकार होय. तेव्हा राज्य व केंद्र सरकारनी वेळीच असे कृत्य करणाऱ्या अनेकांना विविध कायद्या अंतर्गत विविध राज्यात व जिल्हयात त्यांच्या वर गुन्हे दाखल करण्यात येवून देशातील शांतता व समाजीक सलोखा भारतीय संविधानानुसार स्थापित करण्याची नैतिक संविधानीक जबाबदारी राज्य व केंद्र सरकारने स्विकारावी असे मत यावेळी यशवंत तेलंग यांनी व्यक्त केले. व सर्व पक्षीय आंदोलनात एकमताने वरील कृत करणाऱ्या व्यक्तीवर योग्य कार्यवाही न झाल्यास देशातील सर्व राज्यातील व जिल्हयातील पोलिस स्टेशनला त्यांच्यावर कार्यवाही करण्यास झिरो मध्ये रिपोर्ट दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तेव्हा वेळीच कार्यवाही न झाल्यास देशातील संविधान प्रेमी लवकरच तक्रार दाखल आरोपी विरूध्द करतील. या कार्यक्रमात मानकापूर पोलिस स्टेशन, पोलिस विभाग व इतर पोलिस विभाग ने दिलेल्या सहकार्या प्रित्यर्थ सर्व पक्षीय त्यांचे अभिनंदन करण्यात आले. जन आंदोलनाचे संचालन मोरध्वज अढाऊ यांनी तर आभार दिगांबर डोंगरे यांनी मानले.




