spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बहुजन समाज पार्टीचे शहराध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे यांनी केला भांडाफोड

– रेल्वेच्या फसवणूक प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यात 18 ऑगस्टला गुन्हा दाखल झाला परंतु गुन्हेगाराला अध्याप अटक केली नाही

– रेल्वेत नोकरी लावून देतो म्हणून फसवणूक;  चुलतभावानेच १२ लाखांचा गंडा घातल्याचा पत्रकार परिषदेत आरोप 

– बहुजन समाज पार्टीचे शहराध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे यांनी केला भांडाफोड

– रेल्वेच्या फसवणूक प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यात 18 ऑगस्टला गुन्हा दाखल झाला परंतु गुन्हेगाराला अध्याप अटक केली नाही

नागपूर :- रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून २७ वर्षीय तरुण अमन तानवे यांची चुलतभावानेच तब्बल १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना बहुजन समाज पार्टीचे शहर अध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर समोर आली आहे. या प्रकरणी अमन दिनेश तावणे ( रा. महाल) यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी 18 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील आरोपींमध्ये सीमा मिलिंद कानपुटेदार (वय ४४) आणि गुलशन नागोराव तावणे यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमनने २०२४ मध्ये छत्तीसगडमधील रेल्वे भरती बोर्डामार्फत आयोजित टेक्निकल ग्रेड-१ ची परीक्षा दिली होती. यावेळी त्याचा चुलतभाऊ गुलशन याने १६ लाख रुपये दिल्यास रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर गुलशनने अमनची सीमा कानपुटेदार यांच्याशी ओळख करून दिली. सीमानेही रेल्वेत नोकरी मिळवून देण्याची हमी दिल्याने अमनने दोघांवर विश्वास ठेवून टप्प्याटप्प्याने १६ लाख रुपये दिले. मात्र, पैसे दिल्यानंतरही नोकरी मिळाली नाही. त्यामुळे अमनने पैसे परत मागितले. आरोपींनी त्याला केवळ ४ लाख रुपये परत केले, तर उर्वरित १२ लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अमनने कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. FIR क्र. 0219 / 2026 पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला व तपास सुरू केलेला आहे.

गुन्हा दाखल करण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे शहर अध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे हे सतत कोतवाली पोलीस स्टेशनच्या चकरा काटत आखिर 25 दिवसानंतर गुन्हा दाखल झाला.

गुन्हा दाखल 18 तारखेला झाल्यानंतरही आजपर्यंत गुन्हेगारांना अटक केली नाही. कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रपरिषदेत केली आहे.

Popular Articles