spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पं.स. मौदा येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून लीना वालोदे यांची नियुक्ती

– महाराष्ट्र जि प मागासवर्गीय शिक्षक संघटना शाखा मौदा तर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

किशोर साहू, मौदा :- पंचायत समिती मौदा येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून लीना वालोदे यांची आज गुरुवार (ता. 20 ऑगस्ट)ला नियुक्ती करण्यात आली.नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी मौदा लीना वालोदे यांचे महाराष्ट्र जि.प. मागासवर्गीय शिक्षक संघटना, शाखा मौदा यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुकराम रामटेके यांनी पुष्पगुच्छ देऊन वालोदे यांचे अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक व प्रशासकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.यावेळी संकेत मरस्कोल्हे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, ललिता चामट शिक्षण विस्तार अधिकारी ,संजय तांबडे अधीक्षक, शिक्षण विभाग पंचायत समिती मौदा यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्वागत कार्यक्रमास महाराष्ट्र जि.प. मागासवर्गीय शिक्षक संघटना शाखा मौदाचे अध्यक्ष सुकराम रामटेके, धीरज चौधरी,नंदेश गजभिये, अश्विन रंगारी, आयुष वाहने, उमेश बागडकर, कमलाकर ठोसरे, कल्पना वाघमारे , विक्रम आकरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होते.

Popular Articles