संपूर्ण २१ गेट ५० सेंटीमीटरने उघडले
बेला ०९ : जवळचे वडगाव येथील निम्नविना धरणाचा पाणीसाठा ५०% च्या जवळपास झाल्यामुळे धरण सुस्थितीत व नियंत्रणात ठेवण्यासाठी परिचलन आराखड्याप्रमाणे धरणाचे गेट पाण्याची आवक लक्षात घेता बुधवारला सकाळी ९ वा. पासून संपूर्ण 21 गेट उघडले आहे. त्यामुळे नदी पात्रातून पाणी वाहने सुरू झाले आहे.
तरी नदी काठावरील गावांना पाटबंधारे विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वेना नदीपात्रातून आवा-गमन करणाऱ्या सर्व संबंधीतानी स्वतः ची काळजी घ्यावी. कोणीही नदी ओलाडू नये. व पाण्यात जाण्याची धाडस करू नये. जलाशय परिचलन आराखड्याप्रमाणे विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो. त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे.महसूल यंत्रणेसह, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, कृषी व इतर सर्व यंत्रणांनी आवश्यक ती संपुर्ण खबरदारी बाळगून सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या स्तरावरुन ग्रामस्तरावर तसे सर्व संबंधितांना त्वरित सुचीत करावे. असे आवाहन पाटबंधारे उपविभागाची उपविभागीय अभियंता एन ए सावरकर यांनी समाज माध्यमांद्वारे केले आहे.
बुधवार ९ जुलैला सकाळी ७ वाजेपर्यंतची स्थिती
जलाशय पातळी : २५२.३५०
उपयुक्त पाणीसाठा :५७.७८४ दलघमी
पाणीसाठा टक्केवारी : ४२.८४%




