बेला :- वेला पोलीस अवैध धंदयावर कारवाई कामी पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती वरून मौजा बेला, सिर्सी, आणि पिपरा येथे अवैध धंदयावर कारवाई करण्यात आली. अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करत आरोपी नामे १. मोरेश्वर नारायन पराते, रा. सिर्सि २ रमेश नामदेव निमजे, रा बेला, ३. दिनेश घनश्याम चौरे, रा. पिपरा, ४. नितीन भिमराव बडीये, रा. पिपरा, ५. प्रफुल धर्मकांत कवाडे, रा. पिपरा, यांच्यावर मदाका अन्वये ५ गुन्हे दाखल करण्यात आले. नमुद आरोपीतांकडुन एकुण २.७२०/- रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये ४ गुन्हे नोंदविण्यात आला आहे. तसेच १. रूपेश शंकर बारापात्रे, रा. बेला, २. नरेंद्र देवनारायन सोरते, रा. सिर्सि, ३. अमोल हरीभाउ नौकरकर, रा पिपरा, ४. नरेश जित्रुजी सोरते, रा. पिपरा हे वरली मटका चालवितांना मिळुन आल्याने आरोपीतांकडुन एकुण १३२०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमुद आरोपीविरुद्ध मजुका अन्वये ४ गुन्हे नोंदविण्यात आले आहे.
बेला पोलीसांची अवैध धदयांवर कारवाई अवैधरित्या दारू विकी करणाऱ्या ५ गुन्हे, सट्टपट्टी चालविणाऱ्यांवर ४ गुन्हे नोंद


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



