spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गोवंश तस्करी करणाऱ्या कुख्यात ‘सम्राट’ टोळीवर भंडारा पोलिसांची मकोका अंतर्गत कारवाई

हंसराज,भंडारा लाखनी :- भंडारा जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यात गोवंश तस्करी करणाऱ्या कुख्यात ‘सम्राट’ टोळीवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, टोळी प्रमुख सम्राट कांतीलाल येवले (वय ३३, रा. गोरेगाव ) आणि हर्षल योगेश श्रावणकर (रा.शिवणीबोंडकी ) यांनी वर्चस्व व आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी स्थापन करून गुन्हेगारी सुरू ठेवली होती. २१/०६/२०२६ रोजी पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक एम.एच. ४० डी.सी. १३९५ अडवले असता, त्यामध्ये अवैध रित्या कत्तलीसाठी नेली जाणारी १४ जनावरे आढळली, ज्यापैकी ०१ जनावर मृत पावले होते. याप्रकरणी पोलीस स्टेशन लाखनी येथे अप. क्रमांक ३२४/२०२६ कलम ५, ५ (अ), ५ (ब), ९ (अ) महा. पशू संर. अधि. सहकलम ११ (१) (ड) (च) (अ) (ज) (झ) प्रा.छळ प्रति. अधि. सहकलम ११९ म.पो.का. सहकलम ३२५, ४९ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला होता. टोळी प्रमुखावर २०१८ पासून लाखनी, डुग्गीपार, नवेगावबांध, गोरेगाव आणि मौदा येथे एकूण ०९ गुन्हे दाखल आहेत.

पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली आशिष गजभिये यांनी मकोका कायद्यान्वये प्रस्ताव सादर केला होता, ज्यास विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी ०३/०७/२०२६ रोजी मंजुरी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, आशिष गजभिये आणि स्थानिक गुन्हे शाखा व लाखनी पोलीस अंमलदारांनी केली.

Popular Articles