बुटीबोरी पोलीसांची मोठी कामगिरी – मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघड, दोन मोटारसायकली जप्त

0
157

 

बुटीबोरी २९ : बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक २६ जून २०२५ रोजी रात्री मोटारसायकल चोरीची घटना घडली होती. फिर्यादी शनी रूपदेव येरमे (वय ३३, रा. सातगाव, कन्हाळगाव ता. हिंगणा, जि. नागपूर) हे पत्नीसह ईरा चौकात जेवणाचे पार्सल घेण्यासाठी आले असता त्यांनी रोडच्या कडेला उभी केलेली त्यांची मोटारसायकल अज्ञात इसमाने हॅण्डल लॉक तोडून चोरून नेली. या तक्रारीवरून गुन्हा क्र. ६४५/२०२५ भा.दं.वि. कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी  दीपक अग्रवाल यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले यांनी गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पथक गठीत केले. गुप्त माहितीच्या आधारे पथकाने छत्रपती सुरेश मांडवगळे (वय ३१, रा. चेकबेबाळ, ता. मुल, जि. चंद्रपूर) यास २८ ऑगस्ट २०२५ रोजी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच आणखी एक मोटारसायकल चोरी केल्याचे मान्य केले. त्यानुसार पोलिसांनी सीबी शाईन (क्र. एमएच-४० बीएस ८४३७) किंमत ₹६५,०००/- व ग्रे रंगाची सीबी शाईन (विनाक्रमांक) किंमत ₹८०,०००/- असा एकूण ₹१,४५,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू आहे.