spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोठा ताजबागला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा – भूषण दडवे यांची मागणी

नागपूर :- भाजपचे माजी उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे यांनी पत्रकार परिषद घेऊन नागपूरातील मोठा ताजबागला तातडीने ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी केली. या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नसल्याचा आरोप त्यांनी केला. भूषण दडवे यांनी सांगितले की, मोठा ताजबाग हे राज्यातील महत्त्वाचे धार्मिक व ऐतिहासिक स्थळ असून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे या ठिकाणाला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन आवश्यक पायाभूत सुविधा, विकासकामे आणि पर्यटनाच्या दृष्टीने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत शासनाने विलंब न करता सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने पुढील आंदोलनाचा इशारा देखील भूषण दडवे यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी पत्रपरिषदेत मंचावरील भूषण दडवे सोबतच ऍडव्होकेट महेश तायडे आणि मोहन मरोडे यांची उपस्थिती होती.

Popular Articles