spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भाऊबीजेच्या दिवशीच सराफा बाजारात मोठा उलटफेर, सोन्याचे भाव धडाम

गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या भावात चढउतार सुरू आहे. अमेरिकेतील निवडणुकीनंतर आधी सोन्याचे भाव वाढले. त्यानंतर लगेच खाली आले होते. त्यानंतर पुन्हा सोन्याचे भाव वाढले होते. मात्र, आज सराफा बाजारात मोठा उलटफेर झाला आहे. भाऊबीजेच्या दिवशीच सोनं तब्बल 1300 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदीचे भाव स्थिर आहेत. त्यामुळे बहिणींसाठी सोनं खरेदी करण्याची ही नामी संधी आयतीच चालून आली आहे.

ऐन दिवाळीत ग्राहकांसाठी मोठी खूश खबर आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तर चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. सोन्याच्या दरात 1 हजार 300 रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचे दर जैसे थे आहेत. आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 45 हजार 745 रुपये इतका आहे. तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 95 हजार 700 रुपये इतका झाला आहे. आज भाऊबीज असल्याने भावाकडून बहिणीला सोनं गिफ्ट देण्याची चांगली संधी चालून आली आहे.

किरकोळ बाजारातील भाव

किरकोळ बाजाराच्या आज विविध कॅरेटच्या सोन्याच्या किमतींमध्ये किंचित घसरण झालेली आहे. आज देशात 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 14,198 रुपये प्रति ग्रॅम आणि 1,13,584 रुपये प्रति 8 ग्रॅम आहे. कालच्या तुलनेत त्याच्या किमतीत अनुक्रमे 71 रुपये आणि 568 रुपयांची घसरण झाली आहे.

दागिने बनवण्यासाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याचा भाव आज 13,015 रुपये प्रति 1 ग्रॅम आणि 1,04,120 रुपये प्रति 8 ग्रॅम आहे. तो कालच्या तुलनेत अनुक्रमे 65 रुपये आणि 520 रुपयांनी स्वस्त झाला आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत आज 10,649 रुपये प्रति 1 ग्रॅम आणि 85,192 रुपये प्रति 8 ग्रॅमवर आली आहे. यात कालच्या तुलनेत अनुक्रमे 53 रुपये आणि 424 रुपयांची घट दिसून आली आहे. या किमतींमध्ये जीएसटी (GST) आणि मेकिंग चार्ज समाविष्ट नाहीत. स्थानिक कर आणि ज्वेलर्सनुसार अंतिम किमतींमध्ये थोडा फरक होऊ शकतो.

Popular Articles