spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विठ्ठल नगरात जेष्ठ नागरिकांचा सामुहिक सत्कार करून वाढदिवस साजरा.

नागपूर 30 : दक्षिण नागपूर येथील लाडीकर ले आउट जेष्ठ नागरिक समिती विठ्ठल नगर क्र. १ नागपूरच्या वतीने समितीचे पदाधिकारी व सर्व कार्यकारिणीतील सदस्य यांचे सहमतीने समितीतील सदस्यांचा वाढदिवस महिन्यात शेवटच्या आठवड्यात सत्कार करून साजरा करण्यात येतो. सांगण्याचा तात्पर्य म्हणजे याच महिन्यात ६ सदस्यांचा सामूहिक वाढदिवस नुकताच 28 जून रोजी, सार्वजनिक हनुमान मंदिर विठ्ठल नगरात हा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला. त्यावेळी त्या सर्वांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये भानुदासजी शंकरपुरे, रमेशजी डफरे, शालीगामजी मडावी, अरुणजी घोरमाडे, प्रकाशजी उपलवार व  बुलकोबाई ठाकुर या सर्वांचा सत्कार करण्यात आला. तसेच विठ्ठल नगर १ मधील . शाश्रुती विनायक नाकाडे हिने लंडन ते फ्रान्स समुद्र खाडी 11 तास 19 मिनिटात पोहून केलेल्या विक्रमाबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रामरावजी रेवतकर यांनी भूषविले व कार्यक्रमाला सुरुवात झाली. संचालन शामरावजी गोमाशे यांनी केले तर प्रेमदासजी नंदनवार यांनी सर्वांचे आभार मानले व अल्पोपहारांनी कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी कार्यक्रमात ज्येष्ठांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. उपस्थित किशोरजी मेश्राम, केवलरामजी पटोले, छगनराव खानोरकर यांची उपस्थिती होती. असे ज्येष्ठ नागरिक समितीचे अध्यक्ष प्रेमदास सोमाजी नंदनवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.

Popular Articles