spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चांदस वाठोडा येथील रहीवासी स्व.कोंडबाजी गायकवाड यांचा जन्मशताब्दी सोहळा संपन्न.

नागपूर 30 : चांदस वाठोडा निवासी, स्व. कोंडबाजी गायकवाड यांचा जन्मशताब्दी सोहळा नागपुरात मोठ्या आनंदात संपन्न झाला. स्व.कोंडबाजी याचे पुत्र नवभारत विद्यालय, नागपूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण कोंडबाजी गायकवाड यांनी बद्रीनाथ सोसायटी महाकाली नगर मानेवाडा रोड नागपूर येथें कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दीपप्रज्वलन नतंर सकाळी वारकरी भजनाने प्रारंभ झाला.  माधुरीताई कोठे यांचे प्रवचन झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे  राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख होते. प्रस्तावित डॉ. नामदेवजी मोरे यांनी केले  तर संचालन देवरावजी टोंगे यांनी केले. मनोगतीय भाष्य माजी मुख्याध्यापक  जयवंत भोसले आणि अशोक गोबरे यांनी केले. प्रमुख अतिथी ॲड. अभयरावजी गायकवाड होते. हरीश देशमुख यांनी याप्रसंगी चांदस गावाच्या आठवणी सांगितल्या 1942 ला चले जावं  आंदोलनात इंग्रजा विरुद्ध बंड गावातील होतकरू युवकांनी उभारले तेव्हा गायकवाड होते. स्वातंत्र लढयात पोलिसांनी सर्व स्वातंत्र सैनिकांना अटक झाली तेव्हा सुप्रसिद्ध दरोडेखोर म्हणून  झिंगराजी नाईकची कथा सांगून गोरगरिबांना साथ, अन्न धान्य पुरविणारे याचं पिढीतील गायकवाड लोकसेवक नेते होते. अशा शब्दांत प्रशंसा केली. हरीश देशमुख यांनी अंधश्रद्धा निर्मूलन विषयक संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांचे विचार समाजाला पोषक आहे असे सांगितले  माधुरीताई कोठे यांनी प्रवचनात सेवेचे महत्व सांगतांना वयोवृध्द अवस्थेत सेवाभाव मुलांमुली कडून प्राप्त व्हावा. ही परंपरा कायम असावी. असा उपदेश लोकांना दिला. त्यापुढे म्हणाल्या माणूस बनुन मानवाला मदत करणे गायकवाड कुटूंबियांचा उद्देश होता असे प्रतिपादन केले. याप्रसंगी स्वागतगीत अरुण गायकवाड यांनी म्हटले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डॉ. उल्हासिनी गायकवाड, नामदेवराव मोरे, प्रफुल्ल घाडगे यांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Popular Articles