मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानसभेतील भाषणाच्या पुस्तकाचे मंगळवारी प्रकाशन

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्याच्या विधानसभेत २६ मार्च २०२५ रोजी झालेल्या &&num;8220&semi;भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल&&num;8221&semi; या विषयावरील चर्चेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरादाखल केलेले भाषण पुस्तक रुपात येत्या ९ डिसेंबरला प्रकाशित होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी लोक भवन येथे सायंकाळी साडेसहा वाजता राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे&period; यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा&period;राम शिंदे आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड&period; राहुल नार्वेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत&period; महाराष्ट्र विधिमंडळ व वि&period;स&period;पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या पुढाकारातून या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे&period; या सोहळ्याचे आयोजन शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील लोक भवन येथे करण्यात आले असून प्रवेश केवळ निमंत्रितांसाठी असल्याचे संबंधितांनी कळविले आहे&period;<&sol;p>&NewLine;