spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कल्पतरू कॉलोनीत शिक्षकाच्या घरी 2 लक्ष 10 हजार रुपयाची घरफोडी

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कल्पतरू कॉलोनीत दोन दिवसापूर्वी दिवसाढवळ्या एका कुलूपबंद घरातून 1 लक्ष 66 हजार रुपयाची घरफोडी होण्याच्या घटनेला विराम मिळत नाही तोच काल दिवाढवळ्या कल्पतरू कोलोणीत कुलूपबंद असलेल्या शिक्षकाच्या घरातून 2 लक्ष 10 हजार रुपयाची घरफोडी झाल्याची घटना काल सकाळी साडे आठ ते सायंकाळी सहा दरम्यान घडली.यासंदर्भात फिर्यादी रायसोनी कॉलेज चे शिक्षक नुरूल अमीन फैज मोहम्मद वय 36 वर्षे रा कल्पतरू कॉलोनी कामठी ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध बी एन एस 305,331(1) अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी व त्यांची पत्नी हे दोघेही रायसोनी कॉलेज नागपूर येथे प्राध्यापक पदी कार्यरत असून नेहमी प्रमाणे ते काल सकाळी कॉलेज ला गेले असता अज्ञात चोरट्याने घरी कुणी नसल्याची संधी साधून घराच्या मुख्य दाराचा कुलूप तोडून घरात अवैधरित्या प्रवेश करून घरात सुरक्षित ठेवलेले सोने चांदी व हिरे चे असलेले 2 लक्ष 10 हजार रुपये किमतीचे असलेले दागिने चोरून नेल्याची घटना घडली.पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Popular Articles