spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बस कंडक्टरने मध्यरात्री केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

– गावकऱ्यांनी केली धुलाई

देवळी (वर्धा) :- एसटी बससह तालुक्यातील एका गावात रात्री मुक्कामाला असलेल्या कंडक्टरने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना उजेडात आल्यानंतर गावकऱ्यांनी कंडक्टरला पकडून चांगला चोप दिला.

शिवाय रात्रीच पोलिसांना पाचारण करून घटनेतील आरोपीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर शनिवारी आरोपी वाहकावर बीएनएस कलम ७४,७५(२), ७८(२), ३५१(२), एसआर/डब्लू ८, १२ पोक्सोअन्वये गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी नीलेश उर्फ नागसेन राजहंस तायडे (रा. पुलगाव) हा एसटी बसचा कंडक्टर आहे. तो शुक्रवारी रात्री बससह संबंधित गावात मुक्कामी होता. शाळकरी मुलांना देवळी येथे तालुक्याच्या ठिकाणी पोहोचता यावे म्हणून ही बस तेथे मुक्कामी होती. पीडित मुलगी ही शाळेची विद्यार्थिनी असल्याने ती या बसमध्ये दररोज प्रवास करीत होती. त्यातून तिची ओळख करून घेत त्याचा गैरफायदा घेत कंडक्टरने विनयभंग केल्याचे पोलिसांनी सांगितले.

वारंवार मागत होता मोबाइल नंबर

आरोपी हा पीडित मुलीला तिचे नाव विचारून मोबाइल नंबर मागत होता. आरोपीने पीडितेच्या मोबाइलवर स्नॅपचॅट करून तसेच मेसेज पाठवून ‘तू भेटण्यास ये, नाहीतर तुझ्या घरी भेटायला येतो’, अशी धमकी दिली होती.

कंडक्टरचे निलंबन होणार

आरोपी कंडक्टर तायडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची कागदपत्रे मिळाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे वर्धा आगार व्यवस्थापक वाणी यांनी सांगितले.

Popular Articles