spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खापा येथील ‘क’ दर्जा प्राप्त दरगाह सर्वसमभावाचे प्रतीक, सय्यद हजरत बाबा लष्कर शाह व चांद शाह वलीच्या उर्सला प्रारंभ

खापा :- शासनाच्या पर्यटनस्थळाचा ‘क’ दर्जा प्राप्त सय्यद हजरत बाबा लष्कर शाहा शहिद रहमतुल्लाह अलैह हा प्राचीन दरगाह असून येथे शनिवार १८ ऑक्टोंबर २०२५ रोजी मध्यरात्री बाबांच्या समाधीचे तिर्थ (घुस्ल) घेत वार्षीक उर्सला प्रारंभ होईल. हा दरगाह सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असल्याने बाबांच्या दर्शनासाठी दुरदूर वरुन भाविक हजेरी लावणार असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. सय्यद हजरत बाबा लष्कर शाह शहीदच्या दरगाह मध्ये भाविकांच्या मनोकामना (मन्नत) पूर्ण होत असल्याची श्रद्धा आहे. हजरत बाबा ताजुद्दीन हे आपल्या हयातीमध्ये खापा येथील दरगाहमध्ये दर्शनाला यायचे, असे जाणकार सांगतात.

शनिवारी येथील उर्सला सुरुवात होणार असून रविवार १९ ऑक्टोंबर रोजी सावनेर नाका गार्डन जवळून नवजवान संदल व लंगर कमिटी तर्फे संदलला सुरुवात होईल. सायंकाळी संदल शहरात भ्रमण करत बाबा लष्कर्ष शहीद दर्गा येथे पोहोचेल. तसेच बाबा लष्कर शहा शहीद दर्गा मध्ये १९ आणि २० ऑक्टोबर रोजी दिवस रात्र लंगर महाप्रसादाचे वितरण बाबांच्या भक्तांसाठी अविरत अखंडितपणे सुरू राहणार आहे.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाबांच्या मजारवर चादर चढविली जाईल. सोमवारला (दि.२० ऑक्टोबर) सकाळी कुल व फातेहा होऊन बाबांच्या उर्सचे समापन होईल. उर्स यशस्वीतेसाठी नवजवान संदल व लंगर कमिटीचे हाजी अल्ताफ शेख, प्यारू शेख, पियूष बुरडे, नामदेव गजभिये, हाजी रफिक शेख, मुस्ताक सुभेदार, अय्युब पठाण, अफसर छवारे, जाहीर बाबा, मकसूद शेख, शब्बीर बाबा मलंग यांच्यासह कामेटीचे सर्व सदस्य व खापा शहरवासी प्रयत्नरत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.