खापा :- शासनाच्या पर्यटनस्थळाचा ‘क’ दर्जा प्राप्त सय्यद हजरत बाबा लष्कर शाहा शहिद रहमतुल्लाह अलैह हा प्राचीन दरगाह असून येथे शनिवार १८ ऑक्टोंबर २०२५ रोजी मध्यरात्री १.५५ वाजता बाबांच्या समाधीचे तिर्थ (घुस्ल) घेत वार्षीक उर्सला प्रारंभ झाला. हा दरगाह सर्वधर्म समभावाचे प्रतीक असल्याने बाबांच्या दर्शनासाठी दुरदूर वरुन भाविकांनी हजेरी लावली. सय्यद हजरत बाबा लष्कर शाह शहीदच्या दरगाह मध्ये भाविकांच्या मनोकामना (मन्नत) पूर्ण होत असल्याची श्रद्धा आहे.
शनिवारी १८ ऑक्टोबरला येथील उर्सला सुरुवात झाली. रविवार १९ ऑक्टोंबर रोजी सकाळी दर्गा मध्ये झेंडावंदन (परचम कुशाई) करण्यात आली. सायंकाळी पाच वाजता सावनेर नाका गार्डन जवळून नवजवान संदल व लंगर कमिटी तर्फे संदल काढण्यात आला. संदल शहरात भ्रमण करत बाबा लष्कर शाह शहीद दर्गा येथे पोहोला. तसेच बाबा लष्कर शहा शहीद दर्गा मध्ये १९ आणि २० ऑक्टोबर रोजी दिवस रात्र (लंगर) महाप्रसादाचे वितरण बाबांच्या भक्तांसाठी अविरत अखंडितपणे करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाबांच्या मजारवर चादर चढविली जाईल. देशासाठी शांतता व सुव्यवस्था, प्रेम भावणेसाठी दुआ करण्यात आली. सोमवारला (दि.२० ऑक्टोबर) सकाळी कुल व फातेहा होऊन बाबांच्या उर्सचे समापन झाले. अनेक भाविकांनी बाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केला.

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे यांनी आपल्या चमूसह पोलिसांचा चोख व्यवस्था ठेवली. त्यानिमित्ताने आयोजकांनी ठाणेदार भुजाडे यांचे आभार मानले.
उर्स यशस्वीतेसाठी नवजवान संदल व लंगर कमिटीचे हाजी अल्ताफ शेख, प्यारू शेख, पियूष बुरडे, नामदेव गजभिये, हाजी रफिक शेख, सादिक बाघाडे, मुस्ताक सुभेदार, अफसर छवारे, गुड्डू पठाण, छल्लु (रफीक) शेख, इस्माईल (बब्बु बावा) शेख, जहीर बाबा, शब्बीर बाबा मलंग, मकसूद शेख, शाकीर शेख, आसिफ हबीब शेख आदींच्या विशेष सहकार्याने उर्सचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रोहित मुसळे, सुनील धरपाल, गिरधर रोकडे, युनूस अली, युनुस कुरेशी, रामु बोकडे, अजरुद्दीन शेख व शेकडो भक्तगण उपस्थित होते. उर्स यशस्वीतेसाठी दर्गा कमिटीचे सदस्य यांच्यासह खापा शहरवासीयांनी प्रयत्न केले.




