– ६१ लाख ०८ हजारांचा मुद्देमाल जप्त
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- विनारॉयल्टी रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर रामटेक पोलिसांनी जप्त केले असून, टिप्पर चालक-मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई रामटेक येथे तुमसर मार्गावर शनिवारी करण्यात आली. ६१ लाख ०८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संजय केशवराव फुकटकर (४१) रा. निलज ता. मोहाडी, शुभम सुधाकर पुडके (२५) रा. किरणापूर ता. रामटेक अशी आरोपींची नावे आहेत. तुमसर मार्गाने अवैध रेती वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहिती वरून पोलीस निरीक्षक अरविंद कतलाम यांच्या मार्गदर्शनात सह.पोलीस निरीक्षक राजकिरण मडावी, पोलीस हरीशंकर ठाकूर, पोलीस नाईक उमेश गाढवे, अप्रीतकुमार पशीने, पोलीस शिपाई अनिल घोडेस्वार व चालक शिपाई सुदत्त पाटील यांच्या पथकाने पेट्रोलिंग करत असतांना तुमसर कडून रामटेक कडे येणाऱ्या दोन बारा चक्का वाहनांची तपासणी करीत असताना टिप्पर क्र.(एमएच ४९ सिफ ७४७४) व (एमएच ४० सीटी १८१९) प्रत्येकी टिप्पर मध्ये ९ ब्रास रेती अशी एकूण १८ ब्रास रेती वाहतूक करतांना आढळून येताच दोन्ही टिप्पर जप्त करून पोलीस ठाण्यात आणण्यात आली. १८ ब्रास रेतीची एकूण किंमत १०८००० व दोन्ही टिप्पर प्रत्येकी ३० लाख रुपये असे एकूण ६० लाख रुपये, रेती व ट्रकचे एकूण किंमत ६१ लाख ०८ हजार रुपये च्या मुद्देमाल जप्त केला. ट्रकचे मालक सतीश चिंधू बावणे वय २८ वर्ष रा.खापा ता. तुमसर जि.भंडारा यांना सुद्धा अटक करून अप.क्र. ८४९/२०२५ अप.क्र ८५०/२०२५ कलम ३०३ (२), ४९ बी.एन. एस. २०२३ सहकलम ४८(७), ४८(८), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ सहकलम ४, २१ खान आणि खनिज अधिनियम १९५७ सहकलम ३ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम १९८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. टिप्पर क्र. एमएच ४९ सीफ ७४७४ च्या मालक आसिफ खान पठाण इस्माईल खान पठाण वय ३६ वर्ष रा. आझाद कॉलनी, निराला सोसायटी, उमरेड रोड,नागपूर हा घटना वेळेपासून फरार आहे. वरील गुन्हाच्या तपास पोलीस हवालदार शरद रामटेके व पोलीस नाईक अप्रीत कुमार पशिने पोलीस स्टेशन रामटेक हे करीत आहेत.




