spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत  प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मुंबई :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या अधिपत्याखालील जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर कार्यालयामार्फत २०२५-२६ या वर्षासाठी जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सायली जाधव यांनी केले आहे.

जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू आणि क्रीडा मार्गदर्शक यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी अर्जदाराचे महाराष्ट्रात संबंधित जिल्ह्यात सलग १५ वर्षे वास्तव्य असणे, वय ३५ वर्षे पूर्ण असणे आणि किमान १० वर्षे क्रीडा मार्गदर्शक म्हणून कार्य केलेले असणे आवश्यक आहे. तसेच गेल्या दहा वर्षांत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते खेळाडू घडविलेल्या मार्गदर्शक यांसाठी पात्र असतील.

खेळाडू पुरस्कारासाठी अर्जदाराने पुरस्कार वर्षासह मागील पाच वर्षांपैकी किमान दोन वर्षे संबंधित जिल्ह्याचे मान्यताप्राप्त स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केलेले असावे. राज्य, राष्ट्रीय, शालेय आणि केंद्र शासनामार्फत आयोजित स्पर्धांमधील मागील पाच वर्षांतील कामगिरीपैकी सर्वोत्तम तीन वर्षांच्या कामगिरीचा विचार पुरस्कारासाठी केला जाणार आहे.

इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत, सुट्टीचे दिवस वगळता कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई – ४००१०१ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी ०२२-२०८९०७१७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सायली जाधव यांनी केले आहे.

Popular Articles