– दोघे मित्र गंभीर जख्मी तर कार चालक किरकोळ जख्मी
कन्हान :- साटक वरून कन्हान-तारसा मार्गाने बोरी (सिंगोरी) ला लग्नाच्या फोटो सिलेक्ट करण्याकरिता दुचाकीने जाताना बोरी गावच्या बस स्टाप जवळ तारसा कडुन कन्हान कडे भरधाव वेगाने येणा-या व्हाग्यानर कार ने दुचाकीला जोरदार धडक मारल्याने दुचाकी स्वार दोन मित्र गंभीर जख्मी झाल्याने कामठी येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असुन कार चालक किरकोळ जख्मी झाल्याने कन्हान पोलीसानी कार चालका विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार दुर्गेश सिताराम मथुरे वय ३० वर्ष यांचे ७ एप्रिल ला लग्न झाल्याने मित्र हर्षल भास्कर हिंगणकर दोघेही रा. साटक हे दुचाकी क्र. एमएच ४० एजे ६३३७ ने गुरूवार (दि.२३) एप्रिल २०२६ ला १०.३० वाजता साटक वरून बोरी (शिंगोरी ) येथे लग्नाचे फोटो सिलेक्ट करण्यास जाताना मित्र हर्षल हिंगणकर दुचाकी चालवित होता. दुपारी १२ वाजता दरम्यान कन्हान ते तारसा मार्गावर बोरी (शिंगोरी) जवळ समोर एक ट्रक जात होता व दुचाकी पाठी मागे असुन पाठी मागुन एका कारने ओव्हर टेक करू न समोर निघुन गेली. बोरी मोडवर वळण घेत असता तारसा कडुन कन्हान कडे जाणा-या कार क्र. एमएच ४० डीई ०५६९ चे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवुन दुचाकी ला जोरदार धडक मारल्याने दुर्गेश आणि हर्षल खाली पडुन दोघेही गंभीर जख्मी झाल्याने नागरिकांनी चौधरी हॉस्पीटल कामठी येथे नेऊन उपचार्थ दाखल केले. दुर्गेशच्या डोक्याला, डाव्या हाताला, पंजावर आणि उजव्या पायाला जवळ मार लागला असुन डावा पाय हालत नसुन फैक्चर झाल्याने आयसीओ मध्ये दाखल आहे. तसेच मित्र हर्षल ला सुद्धा मार लागल्याने उपचार सुरू आहे. कार चालकाच्या हाता च्या बोटाला किरकोळ मार लागला आहे.
ठाणेदार वैजयंती मंडवधरे यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलीसानी जख्मी फिर्यादी दुर्गेश सिताराम मथुरे यांचे तोंडी बयाणावरून व्हाग्यानर कार चालक सौरभ लोहबरे यांचे विरूध्द अप क्र. २८९/ २०२६ व कलम २८१, १२५ (ए), १२५ (बी)बीएनएस आरडब्लु १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास हे.कॉ. गुरूप्रकाश मेश्राम व गणपत सहारे करित आहे.




