किशोर साहू, मौदा :- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे स्कॉलरशिप, नवोदय आणि स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने शिक्षक, पालक, आणि विद्यार्थी यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यशाळाला मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाऊराव जिभकाटे , मार्गदर्शक म्हणून अनिल हुमणे उपस्थित होते. या कार्यशाळानिमित्त सुरुवातीला मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी या कार्यशाळेचे आयोजन का करण्यात आले? याची माहिती आपल्या प्रास्ताविक भाषणातून पालकांना आणि विद्यार्थ्यांना करून दिले. या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समिती दहेगाव चे अध्यक्ष नितेश इंगळे, शाळा समितीचे उपाध्यक्ष रणधीर आंबिलढुके, प्रमुख पाहुणे म्हणून शेषराव आंबिलढुके, संदिप आंबिलढुके, दामोदर देशमुख,संजय मेहर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन राजेश रोहाड यांनी केले.प्रमुख मार्गदर्शक म्हणून आलेले भाऊराव जिभकाटे यांनी स्कालरशिप, नवोदय परिक्षेत विद्यार्थ्यांना कसे यश मिळेल ? यादृष्टीने शिक्षकांना तसेच पालकांना सुद्धा मार्गदर्शन केले.पालकांची भुमिका किती महत्त्वाची आहे ही माहिती पालकांना समजावून सांगितली.भाऊराव जिभकाटे यांचे विद्यार्थी दरवर्षी स्काॅलरशिप आणि नवोदय येथे नियुक्त होत असतात, त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथील विद्यार्थ्यांना निश्चितच होईल असा विश्वास मुख्याध्यापक वासुदेव भुते व्यक्त केला.
अनिल हुमणे यांनी आपल्या मार्गदर्शनात मराठी आणि बुध्दीमत्ता चाचणीच्या प्रश्नाची उत्तरे विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितले.या कार्यशाळेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद लिलाधर काळबांडे, सुधीर चं आभार प्रदर्शन शिक्षक सुधीर कांबळे यांनी केले.




