spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ऑटोमधून गोवंशीय मांस वाहतूक प्रकरण; जुनी कामठी पोलिसांत गुन्हा दाखल

– बोरकर चौक परिसरातील घटना; अज्ञात ऑटो चालक व मालकाचा शोध सुरू 

कामठी :- जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील बोरकर चौक येथील शितला माता मंदिरासमोर संशयास्पदरीत्या गोवंशीय मांस आढळून आल्याने खळबळ उडाली असून याप्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी अज्ञात ऑटो चालक व मालकाविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुमारे १२.४५ वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपी आपल्या ताब्यातील ऑटोमधून गोवंशीय जनावरांची अवैधरित्या व अमानुषपणे कत्तल करून त्यांचे मांस पांढऱ्या रंगाच्या गोणीत घेऊन जात होते. दरम्यान, संबंधित गोणी बोरकर चौक परिसरातील शितला माता मंदिरासमोर पडल्याची घटना समोर आली.

घटनेची माहिती मिळताच जुनी कामठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. याप्रकरणी पोलीस ठाणे जुनी कामठी येथे गुन्हा क्रमांक 286/2026 अन्वये कलम 5, 5(अ), 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत अज्ञात ऑटो चालक व माल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची फिर्याद पोलीस हवालदार श्रीकांत भीष्णूकर यांनी दिली असून तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील चव्हाण करीत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.