अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या १३ आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद

0
45

मौदा :-  मौदा पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा पावडदौना येथे काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहचुन धाड टाकली असता आरोपी नामे १) मंगेश सहादेवजी मोहनकर, वय ३४ वर्ष, रा. जुनी मच्छीसाद न्यु दुर्गा चौक मौदा २) गुड्डु ताराचंद बारापत्रे, वय २२ वर्ष, रा. जुनी मच्छीसाद गरदेव चौक, मौदा त. मौदा, जि. नागपूर ३) राजु विठ्ठल कुहीकर, वय ५२ वर्ष, रा. जुनी मच्छीसाद, न्यु दुर्गा चौक मौदा ४) दुर्गेश धनराज लांजेवार, वय ३५ वर्ष, रा. वार्ड नं. ५, रामनगर मौदा, ता. मौदा जि. नागपूर ५) शंकर भोजराज बावने, वय ३५ वर्ष, रा. रामनगर मौदा ६) रुपेश नविनराज वानखेडे, वय २८ वर्ष, रा. पावडदौना रोड, वार्ड नं. १४, मौदा ७) महेन्द्र हरीदास उके, वय ४१ वर्ष, रा. ढिवर मोहल्ला, वार्ड नं. १६ मौदा ८) धिरज ईश्वर बावने, वय २४ वर्ष, रा. ढिवर मोहल्ला, वार्ड नं. ८, मौदा ९) रामचंन्द्र रामकृष्ण निखारे, वय ४६ वर्ष, रा. राम नगर, वार्ड नं. ५, मौदा १०) दुर्योधन भोजराज उमक, वय ३८ वर्ष, रा. जुनी मच्छीसाद, न्यु दुर्गा चौक मौदा ११) योगेश बाजीराव केळवदे, वय ३० वर्ष, रा. जुनी मच्छीसाद, न्यु दुर्गा चौक मौदा १२) गुलाम सकुर शेख, वय ४५ वर्ष, रा. पावडदौना रोड, वार्ड नं. १४, मौदा १३) प्रमोद गुलाब निखारे, वय ३७ वर्ष, रा. गरदेव चौक मौदा हे ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळतांना जागीच मिळुन आले. आरोपीतांच्या ताब्यातुन ५२ तासपत्ते व नगदी ३,७१०/- रूपये असा एकुण ३,७६०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन मौदा येथे १२ महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.