spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अवैध रेती वाहतूक प्रकरण; आरोपींवर गुन्हा, वाहनासह ५.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

देवलापार :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे रामटेक उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदाराने खात्रीशीर माहीती दिली की, अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी मौजा चोरबाहुली जवळील नाला येथे नाकाबंदी केली असता ट्रॅक्टर कमांक एम. एच. ४० बी जे ३९४३ त्याला जोडुन विना क्रमांकाची ट्रॉली मिळून आल्याने वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती आढळुन आली. ट्रॅक्टरचा चालक नामे नितेश वासुदेव उईके, वय ३२ वर्ष, रा. सोनेघाट ता. रामटेक हा मिळुन आला. ट्रॅक्टर मालकाचे नाव विचारले असता २) देवचंद देवाधारी, रा. मरारवाडी ता. रामटेक अशी माहीती प्राप्त झाली. तसेच पोलीसांनी आरोपी चालकास रेती वाहतूकीच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याबाबत माहीती प्राप्त झाली पोलीसांनी पंचासमक्ष वर नमुद वाहन १) ट्रॅक्टर क्रमांक एम. एच.-४०/ बी जे ३९४३ व विना क्रमांकाची ट्रॉली किंमती ५,००,०००/- रूपये २) ०१ ब्रास रेती किंमती ४,०००/-रूपये असा एकुण ५०४०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नमुद आरोपी १) नितेश वासुदेव उईके, वय ३२ वर्ष, रा. सोनेघाट ता. रामटेक २) देवचंद देवाधारी, रा. मरारवाडी ता. रामटेक यांच्या विरूध्द पोस्टे देवलापार येथे कलम ३०३(२), ४९ भा.न्या. सं सहकलम ४८ (७), ४८ (८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सहकलम ४, २१ खाण खनिज अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.