कोंढाळी :- रात्री कोंढाळी पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, मरकसुर कलमुंडा रोडने अवैधरित्या जनावरांची वाहतुक केली जात आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी मरकसुर कलमुंडा रोडने नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान टाटा योद्धा गाडी क्र. एम एच २८ बी वी ४६१४ हे मिळुन आले. सदर वाहन चालकास थांबवण्याचा इशारा केला असता वाहन चालकाने पोलीसांचे वाहन पाहुन गाडी थांबवुन वाहनामधुन उडी मारून अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला. पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ११ गोवंश जनावरे असे मिळुन आले. नमुद जनावरांना कोणतीही चारापाण्याची सोय न करता, अंत्यत कमी जागेत दाटीवाटीने कोंबुन, शिंगाला व पायाला आखुड दोरखंडाने बांधुन, चारा पाण्याची व्यवस्था न करता वाहतुक करीत असल्याचे दिसुन आले. पोलीसांनी पंचासमक्ष घटनास्थळावरून एक वाहन टाटा योद्धा वाहन क्र. एम एच २८ वी वी ४६१४ किंमती ५,००,०००/- रूपये आणि ११ गोवंश जनावरे किंमती १,१२,०००/- रूपये असा एकुण ६,१२,०००/- रूपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.
जनावरांची अवैध वाहतूक उघड; आरोपीवर गुन्हा, ११ गोवंशांची सुटका


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



