– ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
मौदा :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदारां मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, मौदा हद्दीतील लापका रोडवरील हटवार यांच्या दुकानाच्या चाळीमध्ये काही इसम व्हिडिओ गेम पार्लरमध्ये मनोरंजनाच्या नावाखाली पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन धाड टाकली असता आरोपी नामे १) उमेश नामदेव महल्ले, वय ४० वर्षे, रा. गर्दै मोहल्ला, मौदा, जि. नागपूर २) तुषार अरुण तागडे, वय २८ वर्षे, रा. बुद्ध चौक, मौदा, जि. नागपूर हे सदर व्हिडिओ गेम पार्लरमध्ये मनोरंजनाच्या नावाखाली संगणकावरील मॉनिटर व सीपीयू (इलेक्ट्रॉनिक मशीन) यांचा वापर करून ग्राहकांकडून पैसे स्वाकारून तसेच मशीनवरील अंकांवर पैशांची बाजी लावून हार-जीतचा जुगार खळविताना जागीच मिळुन आले.
पोलीसांनी पंचासमक्ष १) नगदी २००/- रूपये २) ०२ सीपीयू (इलेक्ट्रॉनिक मशीन) किंमती २०,०००/- रूपये ३) ०२ मॉनिटर ४) ०२ माऊस, ५) ०२ की-बोर्ड असा एकुण ४१,२००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन मौदा येथे कलम ४ व ५ महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.






