कळमेश्वर :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंदयावर कारवाई कामी सावनेर उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना. पोलीस पथकाला गुप्त बामीदारा द्वारे खात्रीशीर माहीती मिळाली की, कळमेश्वर टाउन, सावनेर बायपास शुभारंभ मंगल कार्यालया समोरील चायटपरीचे आडोशाला नकुल मुडवाईक, रा. कळमेश्वर हा लोकांकडून पैसे घेवून दिनांक १७/०२/२०२६ रोजी दुपारी ११:०० वाजे पासुन सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्डकप टी-२० कॅनडा विरूध्द न्युझीलन्ड खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या सामन्यावर मोबाईल व्दारे बेटींग लावून हारजितचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधरे नमुद पोलीस पथकाने घटनास्थळी धाड टाकली असता आरोपी कं १) नकुल राजु मंडवाईक, वय २८ वर्ष, रा. कळमेश्वर वार्ड क. १०, सावनेर बायपास रोड, अजु शेख चे घरी ता. कळमेश्वर जि. नागपुर हा आयसीसी वर्ल्डकप टी-२० कॅनडा विरूध्द न्युझीलन्ड क्रिकेटच्या सामन्यावर मोबाईल फोनव्दारे पैश्यांची देवानघेवून करुन बेटींग करतांना मिळून आला. नमुद आरोपीचा मोबाईल तपासला असता कॅनडा विरुध्द न्युझीलन्ड क्रिकेटच्या सामन्यावर बेटींग लावल्याचे निदर्शनास आले. पोलीसांनी आरोपीला अधिक विचारणा केली असता त्याने माहिती दिली की, आरोपी कं २) रवि खडसे, रा. कळमेश्वर नागपुर याच्यासह मिळुन किकेट सट्टा बेटींग चा जुगाराचा अवैध व्यवसाय करतो अशी माहिती दिली.
पोलीसांनी पंचासमक्ष आरोपीच्या ताब्यातुन १) एक आयफोन १६ प्लस कंपनीचा अॅड्रॉईड मोबाईल फोन किंमती ७५,०००/- रुपये, २) एक विवो कंपनीचा अॅड्रॉईड मोबाईल फोन किंमती १०,०००/- रुपये आणि ३) रोख रक्कम ५०००/- रुपये व साहित्य असा एकूण ९०,००५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नमुद प्रकरणी दोन्ही आरोपी यांच्या विरुद्ध कलम १२ (अ) म.जू.का. ४९ भान्यासं अन्वये पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.




