भिवापूर :- भिवापूर पोलीसांना गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा भिवापूर टाउन, खातीपुरा रोड, येथे शेताजवळ काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहचुन धाड टाकली असता आरोपी नामे १) अजय बिसन वाघमारे, वय ३६ वर्ष, रा. कुंभार मोहल्ला, भिवापूर २) विष्णु दौलत दुधपचारे, वय ३१ वर्ष, रा. आझाद चौक, भिवापूर ३) अमोल किसन नागपूरे, वय २७ वर्ष, रा. गुरूदेव वार्ड भिवापूर ४) अनिल नामदेव नागरिकर, वय ४७वर्ष, रा. गुरूदेव वार्ड भिवापूर ५) सुनिल प्रभाकर नागपूरे, वय ४४ वर्ष, रा. गुरूदेव वार्ड भिवापूर ६) किशोर प्रल्हाद प्रिपळकर, वय ३० वर्ष, रा. गुरूदेव वार्ड भिवापूर हे ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळतांना जागीच मिळुन आले. आरोपीतांच्या ताब्यातुन ५२ ताशपत्ते व नगदी २१९०/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नमुद आरोपी क्र. १ ते ६ यांच्या विरूद्ध कलम १२ (अ) मजुका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.








