बुटीबोरी :- भाग्यश्री धिरबस्सी, उपविभागिय पोलीस अधिकारी, नागपुर विभाग यांचे मार्गदर्शनात बुटीबोरी पोलीस आणि उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालय, नागपुर उपविभाग येथील पोलीस अंमलदाराचे पथक हे बुटीबोरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयावर कारवाई कामी पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, वर्धा ते नागपुर हायवे वरील रूई खैरी शिवारात, वाय पॉईंट जवळील अपना पंजाबी धाब्याच्या मागील मोकळया जागेवर मोहम्मद अकलीम मोहम्मद असलम शेख, वय ३७ वर्ष, रा. रूईखैरी याने स्वतःचे फायदया करीता अवैधरित्या अत्यावशक वस्तुचा साठा करून ठेवला आहे. तसेच अनाधिकृत विनापरवाना रोडनी येणारे जाणाच्या वाहन चालकांना पेट्रोल विक्री करीत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस पथकाने मौजा रूईखैरी शिवार, वाय पॉईन्ट जवळील अपना पंजाबी धाब्याचे मागे पोहचुन धाड टाकली असता आरोपी नामे मोहम्मद अकलीम मोहम्मद असलम शेख, वय ३७ वर्ष, रा. रूईखैरी हा अवैधा विनापरवाना पेट्रोल स्वतः जवळ बाळगुन विक्री करीतांना मिळुन आला.








