spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैधरित्या देशी विदेशी दारूची वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद

उमरेड :- पोलीस स्टेशन उमरेड येथे पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, दुचाकी वाहनाने अवैधरीत्या दारूची वाहतुक केली जात आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी उमरेड भिवापूर रोडवर नाकाबंदी केली असता अॅक्टीवा मोपेड गाडी क एम एच ४९ बी एल ९३४१ ही मिळुन आली. वाहन थांबवुन वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता देशी व विदेशी दारू मिळुन आली. आरोपी नामे मिलींद मोरेश्वर मेश्राम, वय ३४ वर्ष, रा. जोगीठाणा पेठ उमरेड हा अवैधरीत्या देशी विदेशी दारूची वाहतुक करतांना मिळुन आला. पोलीसांनी पंचासमक्ष १) ओल्ड मॉन्क कंपनीच्या विदेशी दारूच्या २० निपा किंमती ४,३००/- रूपये २) देशी दारूच्या ९६ निपा किंमती ७,६८०/- रूपये आणि अॅक्टीवा मोपेड गाडी क्र. एम एच ४९ बी एल ९३४१ किंमती ३०,०००/- रूपये असा एकुण किंमती ४१,९८०/- रुपयाचा मुददेमाल जप्त केला आहे.

नमुद प्रकरणी आरोपी विरूध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Popular Articles