काटोल :- काटोल पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतुक केली जात आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी तात्काळ मौजा रिधोरा येथे नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची मो.सा.क.एम.एच.३२ ए.पी. ५०५८ मिळुन आले त्यावर तिघे इसम बसलेले होते. वाहन थांबवुन वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता विदेशी दारू मिळुन आली. आरोपी कं १) मनिष रविंद्र किरनाके, रा. बांगडापुर ता. कारंजा, २) बादल गौतम ढोके, रा. राहटी ता. कारंजा, ३) प्रतिक सुभाष कुसराम, रा. बांगडापुर ता. कांरजा हे अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतुक करतांना मिळुन आले. पोलीसांनी पंचासमक्ष १) ०१ लिटर क्षमतेची रॉयल स्टंग कंपनीची दारूची बॉटल २) एक १८० मिली क्षमतेची रॉयल स्टॅग दारूची बॉटल ३) मो.सा.क.एम.एच.३२ ए.पी. ५०५८ असा एकुण १६६५०/- रूपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.
नमुद आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन काटोल येथे कलम ६५(३) महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम सहकलम १२८, १७७ मोटर वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.




