– सड़क अर्जुनी नगरपंचायत सफाई कामगारांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
यासीन शेख गोंदिया :- नगरपंचायत सडक अर्जुनी येथे काम करणाऱ्या सफाई कामगारांचे माहे ऑक्टोबर 2025 ते आज पर्यंतचे ईपीएफ चे पैसे मजुरांच्या खात्यात अद्यापही जमा झाले नाही. तसेच कामाच्या मोबदला सुद्धा सफाई कामगारांना मिळालेला नाही त्यामुळे सडक अर्जुनी नगरपंचायत अंतर्गत काम करणाऱ्या सफाई कामगारांनी सडक अर्जुनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. सविस्तर असे की 15 वा वित्त आयोग अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन चे कार्यारंभ आदेश क्र. नपसअ/216/2025 दिनांक 30 /05/ 2025 काम समाज संस्कृती विकास बहुउद्देशीय सेवा संस्था नागपूर या संस्थेला प्राप्त झालेली आहे. व सदर संस्थेमार्फत सफाई कामगार काम करीत आहेत. परंतु सफाई कामगारांना ऑक्टोंबर 2025 ते आज पर्यंत केलेल्या कामाचे ईपीएफ चे पैसे मजुरांच्या खात्यात जमा झाले नाही तसेच केलेल्या कामाच्या मोबदला सुद्धा त्यांना मिळाला नाही . संस्थेच्या माध्यमातून वेळ काढून अवलंबिले जात आहे. त्यामुळे सफाई कामगारांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. करिता जीपीएफ चे पैसे व कामाच्या मोबदला जोपर्यंत कामगारांना दिला जात नाही व त्याची खात्री केली जात नाही तोपर्यंत संबंधित संस्थेला कोणत्याही प्रकारचे देयके अदा करू नये. जर देयके अदाक केल्यास सर्व कामगार आयुक्त यांच्याकडे तक्रार करून नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असा इशारा निवेदन तक्रारीद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देताना राजेश गोहरे, मधु गोहरे, राखी खंडाईत, शोभा नागोसे, देवका हाडगे, शोभा खरोले, गिता अंबादे, आबा खंडाईत, महेंद्र राऊत ,सुनील बडोले, आदी उपस्थित होते.




