नागपुर :- पोलीस अधिक्षक कार्यालय नागपुर ग्रामीण, पोलीस भवन येथे शासकीय सेवेतुन सेवानिवृत्त अंमलदार यांचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. सदर समारंभात हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधीक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या हस्ते सेवानिवृत्त झालेले पोलीस अंमलदार रमेश लच्छमन्ना दोनकलवार, ब.नं २७१ नेमणुक – पोलीस मुख्यालय यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देवुन सत्कार करण्यात आला असुन हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधीक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांनी सेवानिवृत्त अंमलदार रमेश लच्छमन्ना दोनकलवार यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमात मानव संसाधन शाखेच्या प्रभारी पोलीस उपनिरीक्षक जोत्स्ना गिरी व मानव संसाधन शाखेचे अंमलदार हजर होते.



