मंगळसुत्र हिसकावणाऱ्या आरोपीला अवघ्या ३ तासात केले निष्पन्न

0
52

– ६० हजार रूपयांचा संपुर्ण मुद्देमाल जप्त

उमरेड :- पोलीस स्टेशन उमरेड अंतर्गत तक्रारदार नामे केशव लहानु कन्नाके, रा. वार्ड क्र १, मांगरुळ, ता. भिवापुर यांनी तक्रार दिली की, फिर्यादी यांच्या आई  गयना रामदास कन्नाके वय ७० वर्ष, या दिनांक ०१/०२/२०२६ रोजी दुपारी ०१:०० वा. दरम्यान घरी आराम करीत असताना एक अनोळखी ईसम याने त्यांच्या घरात प्रवेश करुन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे अंदाजे ०५ ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र किमती ६०,०००/- रुपये हिसकावुन घेवुन गेला अश्या तोंडी रीपोर्ट वरुन पोस्टे उमरेड येथे कलम ३०४ (२), ३३३ भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेता हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा, अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि वृष्टी जैन, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी, उमरेड उपविभाग यांच्या मार्गदर्शनात उमरेड पोलीसांनी सदर गुन्हयाचा सखोल तपास करीत गुप्तबातमीदाराच्या माहीतीच्या अधारे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या ३ तसात दिनांक ०१/०२/२०२६ रोजी फिर्यादीच्या घरा पासुन थोड्या अंतरावर राहत असलेला आरोपी नामे बादल अरुण सय्याम, वय. २० वर्ष, रा. वार्ड क्र. ०१ मांगरुळ, ता. भिवापुर, जि. नागपूर याला ताब्यात घेवुन त्याचे कडे कौशल्यपुर्ण तपास करीत विचारपुस केली असता त्याने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली.

पोलीसांनी आरोपीला अटक करून आरोपीतांच्या ताब्यातुन गुन्हयात चोरीस संपुर्ण मुद्देमाल ०५ ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र किमती ६०,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.