spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पर्यावरणास अपायकारक असणारा प्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद

नरखेड :- नरखेड पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, इंदीरा नगर नरखेड येथे गणेश गोविंदराव डोंगरे, वय ३५ वर्ष, रा. ईंदीरा नगर, नरखेड ता. नरखेड, जि. नागपूर हा आपले राहते घरी प्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्री करीत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे नरखेड पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि आरोपीच्या घराची पंचासमक्ष घरझडती घेतली असता घराचे बाहेरील खोलीत एका पांढऱ्या बोरीत नायलॉन मांजा प्लॉस्टीक चक्रीमध्ये गुंडाळलेले मिळुन आला. आरोपीचे ताब्यातून एकुण ११ नग नायलॉन मांजा प्लॉस्टीक चक्रीसह किंमती ६,६००/- रूपये असा एकुण ६,६००/- रूपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे.

नमुद प्रकरणी आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन नरखेड येथे कलम १२५, २२३ भा.न्या.सं. सहकलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Popular Articles