spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद

– ३० लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त

भिवापुर :- भिवापुर पोलीस अवैध धंदयांवर कारवाई कामी पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, गडचिरोली कडुन नागपुर कडे हायवा ट्रकने अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक होत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करत तहसिल टी पॉईंट, भिवापुर येथे नाकाबंदी केली असता हायवा ट्रक क्र. एम एच ४० डी के ७७७३ हे वाहन मिळुन आले. वाहनाची पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यात रेती आढळुन आली. वाहनात आरोपी क्र चालक नामे रोहित उत्तम सोनवणे वय २६ वर्ष राहणार हळगाव ता. उमरेड हा मिळुन आला. मालक नामे मौसम सुधाकर मैंद वय २९ वर्ष रा. आरमोरी ता- आरमोरी जि. गडचिरोली याचे सांगणेवरून गडचिरोली येथुन अवैधरित्या रेतीची वाहतुक करीत असल्याचे चालकाने सांगितले. आरोपीला परवान्याबाबत विचारना केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे समजले. पोलीसांनी पंचासमक्ष हायवा ट्रक क्र. एम एच ४०डी के ७७७३ आणि ९ ब्रास रेती असा एकुण ३०,४५,००० /- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. नमुद आरोपी यांच्या विरूध्द भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ४९, भान्यासं सहकलम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम चे कलम ४८ (७) (८), सहकलम कलम ४, २१ खान खनिज नियमन आणि विकास अधिनियम, सहकलम ३, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम, सहकलम १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे .

Popular Articles