spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बोगस आधारकार्ड बनविल्या प्रकरणी आ. रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

– भाजपा पदाधिकारी धनंजय वागस्कर यांच्या तक्रारीनुसार सायबर पोलिसांची कारवाई

– भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची माहिती

मुंबई :- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बोगसगीरी करून जाहीररित्या बनावट कागदपत्रांच्या आधारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधार कार्ड बनवण्याचे प्रात्यक्षिक पत्रकार परिषदेत दाखवले होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस आधार कार्ड बनवणे हा गुन्हा असून हे देशविरोधी कृत्य आहे. असे बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल भाजपाचे सोशल मीडिया सहसंयोजक धनंजय वागस्कर यांनी रोहित पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून त्या आधारे मुंबईतील दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी दिली. संबंधित संरचनेमध्ये भारतात बोगस आधार कार्ड बनवता येत नाही. आ. रोहित पवार यांना याप्रकरणी आता पळ काढता येणार नसून रोहित यांचा ‘बोलविता धनी’ कोण यांचा सखोल तपास होणार असल्याचेही बन यांनी नमूद केले.

https://www.rechrgeservi. shop/admin/index.php या वेबसाईटवरून बनवण्यात आलेले डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड हे खरे असल्याचे भासवत त्याचा वापर बोगस मतदार नोंदणीसाठी होत असल्याचा गंभीर आरोप आ. रोहित पवार यांनी केला होता. देशातील निवडणूक आयोग या स्वायत्त संस्थेविरोधात व भाजपा विरोधात जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे हीन कृत्य रोहित यांनी केले असल्याची टीकाही बन यांनी केली.

आ. रोहित पवार यांच्या या देशविरोधी कृत्यामुळे दोन समूह एकदुस-या विरोधात अपराध करण्यास प्रवृत्त होतील. सार्वजनिक शांतता बाधीत करण्याचे काम आ. पवार यांनी केले असल्याचे धनंजय वागस्कर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीच्या आधारे आ. पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सामाजिक सुरक्षितता धोक्यात आणणारे कृत्य केल्याबद्दल वेबसाईट तयार करणारा, वापर करणारा, वेबसाईटचा मालक व इतर संबंधीतांविरोधात कलम 336(2), 336(3), 336(4), 337, 353(1) (बी), 353(1) (सी), 353(2) भारतीय न्याय संहिता सह कलम 66 (क) माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी तक्रार दाखल करण्यात आली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.